खंडाळा - सुखेड शाळेचा सेहसंमेलन - ४६ हजाराचा शैक्षणिक उठाव .

खंडाळा - सुखेड शाळेचा सेहसंमेलन - ४६ हजाराचा शैक्षणिक उठाव .

Published on

सुखेड शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

खंडाळा, ता. ४ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुखेड (ता. खंडाळा) येथे शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मुलांनी अप्रतिम कलाविष्कार दाखवत कार्यक्रमात रंगत आणली.

या कार्यक्रमाचे उद्‌घाटन जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश धायगुडे व पंचायत समिती सदस्य वंदना रमेश धायगुडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी पाहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी व अंगणवाडीने विविध सांस्कृतिक ठेवा जतन करणारे आपले कलागुण सादर केले. यास प्रेक्षकांनी मोठी दाद दिली.
कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक सोळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र खुडे, राजेंद्र रासकर, अशोक वाघोले, अंगणवाडी सेविका वैशाली धायगुडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी सरपंच रवींद्र धायगुडे, माजी सरपंच गणेश धायगुडे, डॉ. नितीन सावंत, उपसरपंच वैशाली धायगुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप धायगुडे, उपाध्यक्ष प्रियांका धायगुडे, महेश शेळके, शरद कोकरे, पोलिस पाटील रमेश धायगुडे, तंटामुक्त अध्यक्ष अक्षय धायगुडे व मुख्याध्यापक बाळासाहेब सोळसकर उपस्थित होते.

06024
सुखेड : सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी ऋषिकेश धायगुडे, वंदना धायगुडे, सरपंच व इतर मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com