

Pune News
esakal
पुणे: पुणे विमानतळावर शुक्रवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. भारतीय हवाई दलाचे ‘सुखोई’ लढाऊ विमान धावपट्टीवर उतरत असताना ‘हार्ड लँडिंग’ झाले. या अपघातानंतर विमानाने पेट घेतल्याने विमानतळावर एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे पुणे विमानतळावरील नागरी विमान वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली असून, प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. किमान ५० प्रवासी विमानांना याचा थेट फटका बसला आहे.