रमेश थोरात यांच्या गावातही सुळे यांना आघाडी

रमेश थोरात यांच्या गावातही सुळे यांना आघाडी

प्रकाश शेलार : सकाळ वृत्तसेवा
खुटबाव, ता. ६ : दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप पदाधिकाऱ्यांच्या गावांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली. एका बाजूला राष्ट्रवादीचे पदाधिकारी व यंत्रणेची मजबूत फळी असताना सुळे यांनी दौंडमधून निर्णायक आघाडी घेतली आहे. माजी आमदार माजी आमदार रमेश थोरात यांचे गाव असलेल्या खुटबावमधूनही सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे.
दौंड तालुक्यातील हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या गावामध्ये राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळाली आहे. यामध्ये आमदार राहुल कुल यांचे राहू (७८२ मते), गलांडवाडी (२६४ मते), भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांचे शिरापूर (१७२), देऊळगाव राजे (२१५), मिरवडी (३८) या गावांचा समावेश आहे. सुप्रिया सुळे यांना एकट्या दौंड शहराने ४ हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी दिली आहे. सुळे यांना खुटबाव (१३९), नानगाव (३१५), भांडगाव (२५७), पाटस (१५१७), यवत (८१५), पारगाव (४४१), खामगाव (१३६), सोनवडी (५४२), लिंगाळी (२१), आदर्श सांसद ग्राम दापोडी (१२२), वरवंड (१३४०), केडगाव (८८९), वाखारी (३२१) या गावांतून मताधिक्य मिळाले आहे. तसेच, दुष्काळी पट्ट्यातील डाळिंब, भरतगाव, कासुर्डी, खोर, पडवी, कुसेगाव या गावांमध्ये सुळे यांना सरासरी ३०० ते ५००पर्यंत आघाडी मिळाली आहे. त्यामुळे तालुक्यातील मोजकी वगळता इतर गावामध्ये सुळे यांनी आघाडी घेतली आहे. याची परिणीती म्हणून सुळे यांना २५ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.
सुळे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी अप्पासाहेब पवार,
नामदेव ताकवणे, दिग्विजय जेधे, योगिनी दिवेकर, प्रशांत शितोळे, डॉ. वंदना मोहिते, सचिन काळभोर, अजित शितोळे, सोहेल खान, चैतन्य पाटोळे, सचिन गायकवाड यांनी आपापल्या गावांमध्ये सुळे यांना मताधिक्य दिले.

ओबीसी पॅटर्नचा अंदाज चुकला
या निवडणुकीमध्ये केडगाव ग्रामपंचायतीची पुनरावृत्ती करण्यासाठी तालुक्यातील माळी व धनगर समाजाच्या वतीने महेश भागवत यांना उमेदवारी देण्यात आली. भागवत यांना तालुक्यातून १२,१२० मते मिळाल्याने त्यांच्या समर्थकांचे सर्व अंदाज चुकले. त्याचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीवरती पडणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com