सुमन पुनर्वसन केंद्रात स्नेहमेळावा उत्साहात
आळेफाटा, ता. ४ : सुमन पुनर्वसन केंद्रातर्फे २०२५ चा शेवट अनोख्या पद्धतीने करण्यात आला. मानसिक आजारातून बरे झालेल्या (डिस्चार्ज झालेल्या) शुभार्थीचा (रुग्णांचा) व त्यांच्या शुभंकराचा (नातेवाइकांचा) स्नेहसंमेलन मेळावा आळेफाटा येथील सुमन पुनर्वसन केंद्रात घेण्यात आला .
आळेफाटा (ता.जुन्नर) येथील सुमन व्यसनमुक्ती व मानसिक आजार उपचार केंद्रात स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले.याप्रसंगी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निखिल कणसे, डॉ. दत्तात्रेय डुकरे, डॉ. मंदार डुंबरे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. दत्तात्रेय डुकरे म्हणाले की, ‘‘डॉ. निखिल कणसे यांनी गेल्या १४ वर्षांपासून व्यसनमुक्तीसाठी तसेच मानसिक आजारावर रुग्णांना उपचार देण्याचे कार्य अविरतपणे करत आहे. आजपर्यंत सुमन पुनर्वसन केंद्राअंतर्गत ७० हजार पेक्षा अधिक शुभार्थीनी यशस्वी उपचार घेतलेले आहेत.’’ डिस्चार्ज नंतर शुभार्थी व शुभंकर यांनी विशेष कोणती काळजी घ्यावी या विषयावर डॉ. डुंबरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात एकूण ५३ शुभार्थी ३५ शुभंकर उपस्थित होते. या विशेष कार्यक्रमाच्या आयोजन सुमन पुनर्वसन केंद्राचे डॉ. मनोज पांढवळे, श्रीकांत चौगले, संदीप निकम, आदित्य डोईजड, अनुप कांबळे, किरण जोसेफ, दीपक भोर, संदेश थोरात, सौरभ शेटे, सागर हिंगणे, सूरज हिवराळे, पूनम खंडागळे, दीपाली घंगाळे, प्रज्ञा खोचे, सुवर्णा भालेराव, अर्चना बंडलकर यांचा विशेष सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसशास्त्रज्ञ तमन्ना शेख व जनसंपर्क अधिकारी ऋषी साबळे यांनी केले.

