

summer heatwave
sakal
पुणे - राज्यात उन्हाचा कडाका पुढील तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, तसेच अकोला, अमरावती आणि वर्धा येथे गुरूवारी (ता. १६) उष्णतेची लाट येण्याची चिन्हे आहेत. परिणामी या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे.