Pets Animal : पाळीव प्राण्यांना द्या पाणी, पोषक आहार; उन्हाळ्यात दक्षता घेण्याचे आवाहन

वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे पाळीव प्राण्यांनाही विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.
pet animals
pet animalssakal
Updated on

- राधिका वळसे पाटील

पुणे - वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे पाळीव प्राण्यांनाही विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे आवाहन पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. या प्राण्यांनाही उन्हाळ्यात भरपूर पाणी, पोषक आहार द्या, उन्हापासून त्यांना दूर ठेवा, त्यांच्या अंगावर सतत पाणी शिंपडा आदी उपाय त्यांनी सुचविले आहेत.

अचानक वाढलेल्या उन्हामुळे पाळीव प्राणी आजारी पडतात. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी खालावते, त्यामुळे भूक मंदावणे, मलूल पडणे तसेच दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार प्राण्यांत वाढत आहेत. शहरी भागांत वेगवेगळ्या प्रकारचे श्वान, मांजर पाळली जाते तर ग्रामीणभागात गायी, म्हशी, शेळ्या, कोंबड्या तसेच अनेक पक्षी नागरिक पाळतात.

उन्हाळ्यामुळे श्वानांचे आणि मांजरीच्या शरीरातील तापमान वाढल्यामुळे त्यांचे या काळात केस गळतात. अतिसार, थकवा येणे, एकाजागी शांत पडून राहणे किंवा विष्ठा पातळ होणे, जास्त श्वास घेणे, लाळ येणे, सुस्ती येणे, उलट्या होणे आणि कोलमडणे अशी लक्षणे या प्राण्यांत दिसतात.

उष्माघातापासून वाचण्यासाठी....

  • दुपारच्या वेळी प्राण्यांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे

  • प्राण्यांना थंड ठिकाणी ठेवा, भरपूर पाणी पाजा

  • अंघोळीनंतर त्यांचे शरीर पूर्णपणे कोरडे करा

  • उन्हाच्या वेळी प्राण्यांना बाहेर नेणे टाळा

  • शरीराचे तापमान कमी करण्यासाठी पंखे किंवा एअर कंडिशनिंग वापरा ​​

  • त्वचेचा आजार उद्‍भवणार नाही यांची दक्षता घेत त्यांना अंघोळ घाला

  • दुपारी त्यांना डांबर आणि काँक्रिटवर फिरवू नका

  • योग्य, मुबलक आणि पोषक आहार द्या

  • घराभोवती पाण्याने भरलेले भांडे ठेवा

‘ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’ (एडब्ल्यूबीआय) तर्फे उन्हाळा सुरु होताच पाळीव प्राणी तसेच रस्त्यांवरील पशू-पक्ष्यांसाठी विविध योजना, त्यांना लागणाऱ्या सुविधा, मार्गदर्शन, नियमावली जाहीर केली जाते. त्यात नगरपालिका तसेच विविध सामाजिक संस्थांचा समावेश असतो. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याने भरलेले भांडे ठेवणे, ते कायम भरलेले असतील याची दक्षता घेणे, त्यांच्यासाठी शेड उभारणे आदींचा समावेश आहे.

- डॉ. सारिका फुंडे-भोसले, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका

माझ्याकडे ‘हस्की’ या प्रजातीचा श्वान आहे. उन्हाळ्यात त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. आम्ही त्याला पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळातच फिरायला बाहेर घेऊन जातो.

- वैष्णवी मारणे, प्राणीप्रेमी

अंडी, चिकन, मटण आदी उष्ण खाद्यपदार्थ प्राण्यांना देणे टाळावे. यावर उपाय म्हणून पाण्यात दही अथवा ताक मिसळून देणे, कलिंगडाच्या फोडी, काकडी असे पाणीदार पदार्थ त्यांना द्यावे. तसेच स्वच्छ पाणी प्यायला देताना त्यात इलेक्ट्रो पावडर टाकली तरी चालेल.

- शिवराज शेलार, पशुवैद्यकीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com