देशभक्त केशवराव जेधे यांच्या चरित्राचे रविवारी प्रकाशन

केशवराव जेधे यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती यंदा साजरी केली जात आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
keshvarao jedhe
keshvarao jedhesakal media

केडगाव : ज्येष्ठ साहित्यिक य.दि.फडके लिखित देशभक्त केशवराव जेधे चरित्र ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या हस्ते रविवारी ( ता. ७ ) पुणे येथे होत आहे, अशी माहिती केशवराव जेधे फौंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली.

keshvarao jedhe
PMDRA : महानगर नियोजन समितीसाठी येत्या बुधवारी मतदान

केशवराव जेधे यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती यंदा साजरी केली जात आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुस्तक प्रकाशन हा यातील महत्वाचा टप्पा आहे. १९१९ ते १९५९ या चाळीस वर्षांचा कालावधीत केशवराव जेधे यांनी उभारलेल्या सामाजिक चळवळीमुळे बहुजन समाज राजकारण व समाजकारणाच्या मुख्य प्रवाहात सामील झाला. जेधे यांच्या जीवनावर य.दि. फडके यांनी १९८२ मध्ये लिहिलेल्या चरित्र ग्रंथाच्या पुढील आवृत्तीचे प्रकाशन रविवारी होत आहे. शरद पवार यांनी या चरित्रासाठी प्रस्तावना लिहिली आहे. बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी साडेपाच वाजता प्रकाशन सोहळा होईल.

स्वातंत्र्यपुर्व काळात केशवराव यांचे वास्तव्य पारगाव ( ता.दौंड ) येथे अनेकदा राहिले आहे. दौंडमधील सकाळचे पत्रकार भि.ना.ठाकोर व जेधे यांचे घनिष्ठ संबंध होते. जेधे यांचे संयुक्त महाराष्ट्रावरील प्रेम व त्यांच्या निर्भिडपणाबद्दल ठाकोर यांनी एक आठवण सांगितली होती की, पुण्यातील काँग्रेस भवनच्या पटांगणात मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांची जाहीर सभा होती. त्याकाळी गुजरात, मुंबई, महाराष्ट्र अशा तीन प्रदेश काँग्रेस कमिट्या असायच्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष केशवराव ऊर्फ तात्यासाहेब जेधे होते. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीने जोर धरला होता व मुख्यमंत्री मोरारजीभाई त्याचे कट्टर विरोधक होते. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जेधे संयुक्त महाराष्ट्राचा हिरीरीने पुरस्कार करणारे होते. संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणारे व त्याला विरोध करणारे असे दोन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर होते. या जाहीर सभेचे जेधे अध्यक्ष होते.

keshvarao jedhe
"हीच योग्य वेळ! बड्या खेळाडूंना..."; कपिल देव यांचं मोठं विधान

भाषणात मुख्यमंत्री मोरारजींनी महाराष्ट्राच्या मागणीचा उल्लेख करताच सभेचे अध्यक्ष म्हणून जेधे यांनी तो टाळण्याचे त्यांना सुचविले. परंतु मोरारजीभाईंनी त्यास नकार दिला. ते म्हणाले ''मी मुख्यमंत्री आहे. आणि या प्रश्नावर मी बोलणारच.'' तेव्हा केशवरावही संतापले व मोरारजींना ठणकावून सांगितले की, ''तुम्ही मुख्यमंत्री आहात परंतु या सभेचा आज मी अध्यक्ष आहे व माझी सूचना तुम्हाला मानावीच लागेल.'' या खडाजंगीतच शेवटी सभेचे काम अर्धवटच संपले. देशभक्त केशवराव यांच्यासारख्या अनेक धुरंधरांनी जो संघर्ष केला त्यामुळे आज मुंबई शहर महाराष्ट्रात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com