"संडे सायन्स स्कूल'मध्ये विद्यार्थ्यांना 5 जुलैपासून संधी 

sunday-sceience-school
sunday-sceience-school
Updated on

पुणे - विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगातून समजाविण्यासाठी "सकाळ' व "संडे सायन्स स्कूल'च्या वतीने 2011 पासून पुण्यामध्ये दर रविवारी वर्ग भरविले जातात. तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी 22 ते 25 आठवड्यांचा "बालशास्त्रज्ञ बना' हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही सुरू होणार आहे. 

या उपक्रमामध्ये चार वेगवेगळ्या लेव्हल्ससाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मात्र कोरोनामुळे प्रयोगाचे सर्व साहित्य विद्यार्थ्यांना घरपोच मिळेल व ऑनलाइन पद्धतीने विज्ञानवर्ग सुरू होतील. दर रविवारी दोन तासांमध्ये व्हिडिओ व ऑनलाइन पद्धतीने विज्ञानातील संकल्पना समजून घेऊन त्यावर आधारित प्रयोग किंवा सायन्स मॉडेल विद्यार्थी हाताने बनवतील. हा उपक्रम विद्यार्थी जुलै 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान पूर्ण करतील. 

दहा आठवड्यांचा हॅन्ड्‌स-ऑन एक्‍स्पीरेंशियल लर्निंग प्रोग्रॅम (हेल्प) "संडे सायन्स स्कूल'ने विकसित केला आहे. एसएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या विज्ञान पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमानुसार प्रत्येक वर्गासाठी 10 प्रयोगसंच घरपोच मिळणार आहेत. यासोबतच दर्जेदार व्हिडिओ व छापील नोट्‌सही मिळतील. कोरोनामुळे माफक फीमध्ये दोन्ही उपक्रम उपलब्ध केले आहेत. वरीलपैकी कोणत्याही उपक्रमात सहभागी होणाऱ्या सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान पाठ्यपुस्तकावर आधारित ऍनिमेशनचा वापर असलेला डिजिटल अभ्यासक्रम मिळणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड येथील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. दोन्ही उपक्रम 5 जुलैपासून सुरू होणार आहेत. 

आठवड्यांचा पाठ्यपुस्तकावर आधारित प्रयोगसंच 
- शुल्क ः 2200 रुपयांच्या पुढे (सर्वसमावेशक) 

22 ते 25 आठवड्यांचा ऑनलाइन विज्ञान वर्ग 
- दर रविवारी लाइव्ह क्‍लास 
- शुल्क ः 4600 रुपयांच्या पुढे (सर्वसमावेशक/ दोन हप्त्यात भरण्याची सोय) 

अधिक माहितीसाठी ः 9373035369 /9850047933/8779678709 
येथे करा मेसेज ः 9607208552 (विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता व बोर्ड असा व्हॉट्‌सऍप मेसेज करा.) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com