esakal | पुण्यातून यूपी, बिहारसाठी रविवारी रेल्वेगाड्या; आजपर्यंत एवढे मजूर परतले गावी
sakal

बोलून बातमी शोधा

Sunday trains from Pune to UP Bihar and Himachal Pradesh

पुणे रेल्वे स्थानकावरून रविवारी (ता. १७) उत्तर प्रदेशसाठी २, हिमाचल प्रदेश व बिहारसाठी प्रत्येकी एक अशा एकूण ४ रेल्वेगाड्या सोडण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली.

पुण्यातून यूपी, बिहारसाठी रविवारी रेल्वेगाड्या; आजपर्यंत एवढे मजूर परतले गावी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून रविवारी (ता. १७) उत्तर प्रदेशसाठी २, हिमाचल प्रदेश व बिहारसाठी प्रत्येकी एक अशा एकूण ४ रेल्वेगाड्या सोडण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून रविवारी (ता. १७) मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेशासाठी प्रत्येकी एक, उत्तरप्रदेशसाठी एकूण ५, आणि बिहारसाठी २ अशा एकूण ९ रेल्वेगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये एकूण १२ हजार २७३ प्रवासी पाठविण्यात येणार आहेत.

पुण्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात आजपर्यंतची उच्चांकी संख्या

रविवारी पुणे स्थानकावरून उत्तर प्रदेशसाठी २, हिमाचल प्रदेश व बिहारसाठी प्रत्येकी एक अशा एकूण ४ रेल्वेगाड्या प्रस्तावित आहेत. सातारा रेल्वेस्थानकावरून उत्तर प्रदेशसाठी २ रेल्वेगाड्या प्रस्तावित आहेत. याशिवाय सांगली येथून उत्तर प्रदेशसाठी एक, कोल्हापूर येथून बिहारसाठी एक तर सोलापूर येथून मध्यप्रदेशसाठी एक रेल्वेगाडी नियोजित आहे.

आजअखेर ५३ हजारांहून अधिक मजूर परतले
पुणे विभागातून १६ मेपर्यंत मध्यप्रदेशासाठी १४, उत्तरप्रदेश १९ उत्तराखंड १, तमिळनाडू १, राजस्थान ४ आणि बिहारसाठी ३ अशा एकूण ४२ रेल्वे रवाना करण्यात आल्या आहेत. यामधून ५३ हजार ४९२ मजूर परराज्यात मूळगावी पाठविण्यात आले आहेत.