माळेगाव - माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील नागेश्वर मंदिरात नागेश्वर लिंगावर आज महाशिवरात्रीच्या मुहूर्त ११ किलो वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची स्थापना झाली. राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते वरील धार्मिक कार्यक्रम झाला.
विशेषतः यावेळी आयोजित रुद्र याग विधी सोहळ्यात तीनशे पेक्षा अधिक हिंदू, मुस्लिमसह विविध जाती धर्मातील लोकांना पुजेचा मान देण्यात आला होता. नागेश्वर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक तावरे, उपाध्यक्ष संग्रामसिंह तावरे -लाखे आदी विश्वस्त मंडळाने सदर कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता.
माळेगाव येथील नागेश्वर मंदीराच्या जीर्णोधाराचे काम सन १९९५ मध्ये नागेश्वर विकास प्रतिष्ठांचे अध्यक्ष दीपक तावरे व विश्वस्त मंडळाने सुरू केले होते, तर सन २००२ मध्ये या मंदीराचे काम पुर्णत्वाला आले होते. माळेगावमधील दानशूर लोकांनी ११ किलो वजनाचा चांदीचा मुखवटा मंदीर विश्वस्तांकडे याआगोदर सुपुर्द केला होता.
त्यानुसार आज (बुधवारी) खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सदर मुखवट्याची स्थापना महाशिवरात्रीचा मुहूर्तावर नागेश्वर लिंगावर करण्यात आली. यावेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, दत्तात्रेय येळे, रणजीत तावरे, नागेश्वर प्रतिष्ठांचे अध्यक्ष दीपक तावरे, विश्वस्त संग्रामसिंह तावरे, अशोकराव सस्ते, रामभाऊ वाबळे, कल्याण आबा तावरे, चंद्रकांत जाधव, शरीफ तांबोळी, रमाकांत भुंजे, धैर्यशिल तावरे, राजेंद्र लोणकर, नितीन तावरे, अशोकराव तावरे, संजय भोसले, शिवराज जाधवराव, जयदीप तावरे, विलास तावरे, वसंत तावरे, मिलींद तावरे, धनवान वदक आदी भाविक उपस्थित होते.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात माळेगावला उपमुख्यमंत्री अजित दादांच्या प्रयत्नातून ३५० कोटींचा निधी मंजूर झाल्याचा उल्लेख आवर्जून केला. त्या विकास आराखड्यामध्ये आरोग्य , शिक्षण, रस्ते, दिबाबत्ती, पाण्याच्या सुविधांबरोबर नागेश्वर मंदिराचा समावेश असल्याचे सांगितले. त्याच वेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत पवार यांच्या कार्याचे स्वागत केले.
यावेळी सौ. पवार यांच्या हस्ते चांदीचा मुखवटा देणाऱ्या दानशूर लोकांचा सन्मान झाला. त्यामध्ये शिवाजी क्षीरसागर, आकाश तावरे, धैयर्शिल तावरे, रोहन भोसले, श्रीजीत पवार, अजय काटे यांचा समावेश होता.
वरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भ्रमांडनायक स्वामी सेवा केंद्र माळेगाव, परफेक्ट अकॅडमी माळेगाव आणि अभय व ओंकार चावरे, प्रणव तावरे आदींनी योगदान दिले. प्रस्ताविक अॅड.राहूल तावरे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.अनिल धुमाळ यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.