

Sunetra Pawar speaks to the media in Baramati amid speculation over the NCP merger.
esakal
बारामती : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर वेळ येईल तशा सर्व गोष्टी तुम्हाला समजतील, असे सांगून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढविला आहे. नेमके काय होणार या बाबत पुन्हा एकदा तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
एकीक़डे राष्ट्रवादीच्या आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीची वेळ मागितल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर बुधवारी (ता. 11) बारामतीत माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांनी अगदी एका वाक्यात हा विषय संपविला. वेळ येईल तशा गोष्टी समजतील या त्यांच्या विधानाचा नेमका काय अर्थ याचे तर्क वितर्क सुरु झाले आहेत.