

Sunetra Pawar Directs Strict Action Against Crime | Pune Police Review Meeting
esakal
पुणे : शहराची शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखणे ही पोलिस दलाची जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर, कोयता गँग आणि ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर वचक निर्माण करावा. गुन्हेगारी प्रवृत्तींचे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.