DCM Sunetra Pawar and Purushottam Jagtap
sakal
बारामती - श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचा निकाल सोमवारी (ता. 12) जसजसा समोर येत गेला, तसतसा राष्ट्रवादीच्या गोटात जल्लोष होत गेला. संध्याकाळी सहा पर्यंत जाहीर झालेल्या सातही जागांवर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनेलने विजय मिळविला होता. माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचाही पराभव झाला.
गट दोन मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार राजवर्धन शिंदे यांना 14015, विक्रम भोसले यांना 13854 व ऋषीकेश गायकवाड यांना 13941 मते मिळाली. पुरुषोत्तम जगताप यांना 7364, वैभव गायकवाड यांना 6168 तर सतीश सकुंडे यांना 5568 मते मिळाली. मोठया फरकाने पुरुषोत्तम जगताप यांना पराभवाला सामोरे जावे लागले.