Suhana Swasthyam
sakal
पुणे
Suhana Swasthyam: सुनिधी चौहानच्या गाण्यांवर पुणेकर ‘फना’; ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ मध्ये रंगली संस्मरणीय मैफील
Sunidhi Chauhan Pune Concert: सुनिधी चौहान यांच्या बहारदार, ऊर्जा ओसंडून वाहणाऱ्या सादरीकरणाने पुणेकर अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. ‘क्रेझी किया रे’ ते ‘फना’पर्यंतच्या गाण्यांनी मैफिल रंगली आणि श्रोतृवर्ग तल्लीन झाला.
पुणे : अफाट ऊर्जा, दिलखेचक अदा, डोळ्यांचे पारणे फेडणारे नृत्य आणि बेभान करणारी बहारदार गाणी, अशा सुरेख मिलाफातून एक संस्मरणीय मैफील पुणेकरांनी अनुभवली. प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांच्या ‘आजा नचले’ म्हणणाऱ्या ‘क्रेझी किया रे’ गाण्यांसाठी पुणेकर ‘दिल्लीवाली गर्लफ्रेंड’ सोडून आले अन् या ‘कमली’च्या ‘डिस्को दिवाने’ करणाऱ्या सादरीकरणावर ‘फना’ झाले.

