सुनील भापकर यांना 
आदर्श कर्मचारी पुरस्कार

सुनील भापकर यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार

Published on

शिर्सुफळ, ता. १४ : ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानाअंतर्गत आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात जिल्हा परिषद, पुण्यातील सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहायक व माजी सैनिक सुनील भापकर यांना राज्यस्तरीय आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्काराने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मराठी अभिनेत्री शिवाली  परब, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार शंकर मांडेकर, आमदार बापूसाहेब पठारे, अपर आयुक्त नितीन माने तसेच पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्यासह विविध मान्यवर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भापकर हे माजी सैनिक असून त्यांनी सैन्यात सेवा बजावत असताना जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये सहभाग नोंदवला. देशसेवा आणि शासकीय सेवेतही त्यांनी प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कामांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यस्तरीय आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com