

Coriander Farming Success Story
esakal
पारगाव: पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक शेतीची कास धरल्यास शेती हा नक्कीच फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो, हे एका प्रगतशील शेतकऱ्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील काठापुर बुद्रुक येथील सुनील बाळासाहेब पोखरकर या शेतकऱ्याने अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत १० एकर क्षेत्रातील कोथिंबीर पिकातून तब्बल २० लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे पोखरकर यांची स्वताची जमीन नसताना खंडाने करायला घेतलेल्या शेतीतून हे उत्पन्न मिळवले आहे त्यांच्या या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे.
सुनील पोखरकर यांची स्वता:ची घरची जमीन कमी असल्याने त्यांनी अजित हिंगे यांची लाखनगाव व पोंदेवाडीच्या हद्दीवर असलेली १० एकर जमीन खंडाने घेतली