Vidhan Sabha 2019 : हडपसर मतदार संघात 'स्टारवॉर'; सनी देओल प्रचाराच्या मैदानात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 October 2019

Vidhan Sabha 2019 :  पुणे :  राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेच्या रॅलीला उत्तर देण्यासाठी भाजपच्यावतीने बॉलिवूड अभिनेते, खासदार सनी देओल यांचा 'रोड शो' काल(मंगळवारी) झाला. विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पुण्यातील प्रचारामध्ये आता एक प्रकारची चुरस पहायला मिळत आहे. 

हडपसर मतदार संघात भाजपचे योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत आहे. या मतदार संघात भाजपचे योगेश टिळेकर यांच्या प्रचारासाठी सनी देओल मैदानात उतरले आहेत. मतदार संघात त्यांची काल रॅली आयोजित करण्यात आली होती. 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनेते, खासदार डॉ अमोल कोल्हे यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. हडपसर मतदार संघातील अनेक प्रभागात त्यांची रॅली काढण्यात आली होती.त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता. मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचारासाठी सोमवारी राज ठाकरे यांची सभा पार पडली तर, भाजपने आज सनी देओलला मैदानात उतरवले. एकूण काय तर या मतदार संघात 'स्टारवॉर' पहायला मिळत आहे..

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunny Deol in the Hadapsar constituency of Maharashtra Vidhan Sabha 2019 to campaign of Alliance