esakal | सीमावर्ती भागातील दंगलीत गोळीबारात पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Vaibhav Nimbalkar

सीमावर्ती भागातील दंगलीत गोळीबारात पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - आसाम व मिझोरमच्या (Assam Mizoram) सीमावर्ती भागामध्ये उसळलेल्या दंगलीमध्ये (Riot) सोमवारी आसाम पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जोरदार दगडफेक व गोळीबार (Firing) करण्यात आला. या घटनेत मुळचे बारामतीचे असलेले व सध्या आसाममधील कचारा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक असणारे वैभव निंबाळकर (Vaibhav Nimbalkar) यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांची प्रकृती ठिक असून त्यांच्यावर उपचार (Treatment) सुरू आहेत. दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेत निंबाळकर यांचे दोन सुरक्षारक्षक पोलिसांसह काही पोलिसांचा मृत्यु झाला आहे. (Superintendent of Police Vaibhav Nimbalkar Injured in Assam Mizoram Riots)

भारतीय पोलिस सेवेतील आसाम केडरचे पोलिस अधिकारी वैभव निंबाळकर हे सध्या आसाममधील कचारा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षकपदी कार्यरत आहेत. आसाम व मिझोरम या दोन्ही राज्यातील सीमाभागाच्या कारणावरून मागील सहा ते सात दिवसांपासुन तणापुर्ण वातावरण आहे. दरम्यान, आज दोन्ही राज्यातील नागरीकांमधील वाद पेटला. त्यातुन दगडफेक व गोळीबाराची घटना घडली.

हेही वाचा: पुणे : कोव्हीशील्डच्या दुसऱ्या डोससाठी मंगळवारी ६० टक्के लस

या घटनेवेळी निंबाळकर हे त्यांच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत कचारा जिल्ह्यामध्ये बंदोबस्तावर होते. त्यावेळी मिझोरमकडील नागरीकांनी आसाम पोलिसांच्या दिशेने गोळीबार व जोरदार दगडफेक केली. त्यामध्ये बंदोबस्तावर असणारे निंबाळकर यांच्या दोन सुरक्षारक्षकांना गोळ्या लागल्या. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. तर निंबाळकर यांच्यावर देखील गोळीबार झाला. सुदैवाने निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

निंबाळकर हे मुळचे बारामतीचे आहेत. निंबाळकर हे 2009 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) निवड झालेले ते सर्वाधिक तरुण अधिकारी आहेत. आसाम केडर त्यांना प्राप्त झाल्यापासून ते आसामध्ये कार्यरत आहेत. आसाममधील बकसा, जोरहट, तीनसुखीया या तिन जिल्ह्यांचे पोलिस अधिक्षक म्हणून त्यांनी काम पाहीले आहे. गुहावटीमध्ये सहायक पोलिस उपहानिरीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहीले आहे. आसामधील निवडणुकीनंतर त्यांनी कचारा जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकपदाचा कार्यभार स्विकारला आहे. दरम्यान, अंमली पदार्थांच्या तस्करीवरही निबांळकर यांनी विशेष कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना मागील वर्षी सुवर्णपदकाने गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर तेल कंपन्यांमधील गैरव्यवहार प्रकरणी तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांनी कारागृहात पाठविले आहे.

loading image
go to top