मार्केटयार्ड बंद तरी पुण्यात भाज्यांचा पुरवठा सुरळीत;फळांचा तुटवडा

The supply of vegetables in Pune is smooth even though the marketyard is closed
The supply of vegetables in Pune is smooth even though the marketyard is closed
Updated on

मार्केट यार्ड(पुणे) : गुलटेकडी येथील मार्केट यार्ड बंद झाले असले तरी अद्याप शहरात भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत आहे. परंतु ही परिस्थिती कायम राहिली तर पुरवठ्यात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. तसेच सध्या भाजीपाला आणि फळांना मागणी कमी आहे. मागणी कमी असली तरी किरकोळ बाजारात भाजीपाला, फळांचे भाव चढेच असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचत आहे.

सध्या घरगुती ग्राहकांकडून फळांना मागणी खूप कमी आहे. बाजारात संत्री मोसंबी आणि सफरचंदाचा तुटवडा आहे. यामध्ये २०-३० टक्क्यांनी भाव वाढ झाली आहे. तर आंबा, चिक्कू, द्राक्षे यांच्या भावात घट झाली आहे. बाजारात फळांची मागणी कमी झाल्याने व्यापारी गाड्या मागवण्याचे धाडस करत नाहीत. गाडी मागवली तरी वेळेत पोहचत नाही. प्रशासनाने शेतमालाच्या गाड्यांची वाहतूक सुरळीत करण्याची गरज असल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील वेल्हे, सासवड, मुळशी, चाकण, खेड, मंचर भागातून सध्या भाजीपाल्याचा पुरवठा होत आहे. परंतु अनेक अडचणींना तोंड देत वाहने शहरात येत आहेत. भाजीपाला आणि फळांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकांना पोलिसांनी सहकार्य करण्याची गरज आहे. शहरात हॉटेल व्यावसायिक आणि खानावळी चालकांकडून मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी केला जातो. परंतु सध्या ते बंद आहेत. त्यामुळे घरगुती ग्राहक भाजीपाला, फळे खरेदी करत आहेत. परंतु अपेक्षेपेक्षा फळांची मागणी खूप कमी आहे. उठाव नसल्याने माल शिल्लक राहत असल्याचे किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.
 

शहरातील वेगवेगळ्या भागातील आठवडे बाजारातील विक्रेत्यांनी शेतीमाल खरेदी करून त्याची विक्री सोसायट्यांच्या आवारात करण्यास सुरुवात केली आहे. ज्या भागात कठोर निर्बंध आहेत, तेथे भाजीपाला विक्रीच्या गाड्या पोहोचू शकत नाहीत.
- प्रकाश ढमढेरे, किरकोळ विक्रेते.

मार्केट यार्डात येणाऱ्या शेतमालाच्या गाड्या आणि शेतमाल क्विंटलमध्ये

सुरळीत बाजार चालू होता तेंव्हा - १८०० ते २४०० गाड्या - ५०-६० हजार क्विंटल
२० मार्च ते १० एप्रिल दरम्यान  - ४००-५०० गाड्या - १९-२० हजार क्विंटल

 सध्या - मार्केट यार्ड बंद असल्याने आवक नाही

- लॉकडाऊनमुळे रस्त्यावर उभे राहून विक्री करणारे विक्रेते बंद झाले
- हॉटेल आणि खानावळी बंदमुळे ७० टक्के मागणी घटली
- घरगुती ग्राहकांकडून मागणी कमी
- विक्रीच्या वेळेमुळेही मागणीवर परिणाम
- काही भागात माल शिल्लक तर काही भागात तुटवडा

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com