Pune News : दुष्काळात ज्वारीच्या बियाण्यांचे पाठबळ! पावसावर लागवडीचे क्षेत्र ठरणार; शेतकऱ्यांना मिनीकिटचे वाटप

पावसाअभावी रब्बी हंगामातील पेरण्यांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात येणाऱ्या आणि पशुधनासाठी दर्जेदार चारा उपलब्ध करून देणाऱ्या ज्वारीच्या लागवडीला प्रोत्साहन.
Sorghum Seeds

Sorghum Seeds

sakal

Updated on: 

- नरेंद्र साठे

पुणे - पावसाअभावी रब्बी हंगामातील पेरण्यांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात येणाऱ्या आणि पशुधनासाठी दर्जेदार चारा उपलब्ध करून देणाऱ्या ज्वारीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात १५ हजार ८६० बियाणे मिनीकिट दिले जाणार आहेत. त्यातून ६३४ क्विंटल ज्वारीचे बियाणे उपलब्ध होईल. दरवर्षीच्या नियमित बियाणे वाटपाव्यतिरिक्त यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच अतिरिक्त मिनीकिट उपलब्ध होणार आहेत. मात्र, ज्वारीचे प्रत्यक्ष क्षेत्र किती राहणार, हे पेरणीपुरता पाऊस होईल की नाही, यावर अवलंबून असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com