Hinjawadi Issues : हिंजवडीतील परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार : खासदार सुप्रिया सुळे
Pune Development : हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधांचा अभाव आणि वाहतूक समस्यांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार, पीएमआरडीए व एमआयडीसीला जबाबदार धरले असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्व संबंधितांची बैठक बोलवावी, अशी मागणी केली.
पिंपरी : हिंजवडीतील परिस्थितीला राज्य सरकारसह ‘पीएमआरडीए’ व ‘एमआयडीसी’ जबाबदार असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. एवढ्या मोठ्या आयटी पार्कला ग्रामपंचायत पायाभूत सुविधा देऊ शकत नाही.