Supriya Sule : इंदापूरातील शेतकऱ्यांना झालेल्या रस्त्याच्या फायद्याची माहिती संसदेमध्ये देणार

माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणेमामांच्या कामाचे ही केले कौतुक
Supriya Sule
Supriya Sulesakal

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील बोरी गावासह तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या रस्त्याच्या फायद्याची माहिती संसदेमध्ये देणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगून माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या कामाचे कौतुक केले.

बोरी (ता.इंदापूर) येथे आपला मतदार संघ,आपला अभिमान या अभियानातंर्गत येथील सुभाष शिंदे,मल्हारी शिंदे यांच्या द्राक्ष शेती,शेततळ्शाची पाहणी करत असताना शेतकऱ्यांच्या बोलत होत्या. यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे मामा यांच्यामुळे बोरी परीरासह तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत.

पूर्वी डांबरी रस्ते नसल्यामुळे रस्त्याचा धुराळा उडून द्राक्षांच्या घडावरती बसत होता. यामुळे रस्त्याच्या कडेच्या बागेतील द्राक्ष निर्यात होत नव्हती.रस्त्याची कामे मार्गी लागल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले असून द्राक्षे मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहेत. तसेच वीजेचा प्रश्‍न सुटल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. यावेळी सुळे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करताना माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या कामाचे कौतुक करुन रस्ते व वीजेचा फायदा शेतकऱ्यांना कसा प्रकारे झाला याची माहिती संसदेमध्ये देणार आहे.तसेच इंदापूर तालुक्यातील शेतकरी मेहनत,कष्ट करीत असून कष्टाचे फळ मिळत असल्याचे सांगितले.

यावेळी सुळे यांना बोरीमधील शेतकऱ्यांनी पवार कुंटूब सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असून अवकाळी पाउस,तसेच नैसगिक आपत्तीच्या वेळी मदतीचा हात देतात. देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार साहेबांमुळे शेतीचे यांत्रिकीकरण झाले असून शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. साहेबांच्या सहकार्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक औषध फवारणीचा ब्लोअर मिळाला असून द्राक्षाचे क्षेत्र वाढले आहे.

बोरीमधील सुमारे ८० टक्के काळी द्राक्षे चायनामध्ये एक्सपोर्ट होत असून द्राक्ष शेतीमध्ये बोरी परीसरातील शेतकऱ्यांनी राहणीमानामध्ये बदल झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे जिल्हाचे अध्यक्ष भारत शिंदे, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,अशोक पाटील, संचालक अभिजित रणवरे, बोरीचे माजी सरपंच संदीप शिंदे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुंमत कोकाटे, डी.एन. जगताप, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com