सुप्रिया सुळे म्हणतात, 'पुण्याचा महापौर आता राष्ट्रवादीचाच'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

वारजेकर नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिशी राहिल्याने वारजे परिसरात अनेक मोठी विकास कामे झाली आहेत. असे सांगून सुळे म्हणाल्या, "नगरसेविका सायली वांजळे ही कर्तृत्ववान वडिल(सोनेरी दिवंगत आमदार रमेशभाऊ वांजळे) यांची कर्तृत्ववान मुलगी आहे.

वारजे माळवाडी(पुणे) : ''पुणे महापालिकेच्या निवडणूका एक वर्षांनी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मी जबाबदारीने हे विधान करते की, पुणे महापालिकेच्या 2022 च्या निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार आहे.', असे सूचक विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. 

वारजे माळवाडी परिसरातील नगरसेविका सायली रमेशभाऊ वांजळे- शिंदे यांच्या प्रयत्नातून करण्यात आलेल्या न्यु अहिरेगांव ते शिंदे पुल जॉगिंग ट्रॅक व स्व.सोनेरी आमदार रमेशभाऊ वांजळे वाचनालय याचा उद्घाटन खासदार सुप्रिया सुळेंच्या हस्ते आज सोमवारी झाले. यावेळी त्या बोलत होत्या. 

"सीरम'ला लसीची पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार

वारजेकर नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिशी राहिल्याने वारजे परिसरात अनेक मोठी विकास कामे झाली आहेत. असे सांगून सुळे म्हणाल्या, "नगरसेविका सायली वांजळे ही कर्तृत्ववान वडिल(सोनेरी दिवंगत आमदार रमेशभाऊ वांजळे) यांची कर्तृत्ववान मुलगी आहे. लग्नापूर्वी आई, भाऊ व चुलते यांच्या सहकार्याने लग्नानंतर पती, सासू सासरे व अन्य सासरची मंडळीच्या सहकार्याने या परिसरात लोकाभिमुख कामे केली."

बराटे म्हणाले,  "प्रस्तावित रिंगरोडमुळे पुनर्वसन झालेले आहिरेगाव व माळवाडी प्रभावित होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे  यांच्या माध्यमातून आम्ही तो प्रश्न सोडविणार. पालिकेत २३ गावे समाविष्ट करण्याचा व राज्यात गुंठेवारीचा निर्णय घेतला. यामुळे सामान्य नागरिकांच्या घरांचे सरंक्षण होईल. तर यातून मिळालेल्या उत्पन्नातून याच परिसराचा विकास होण्यास मदत होईल. 

युवक दिन विशेष : कौशल्यासह हवा काम करण्याचा दृढ निश्‍चय

"मागील चार वर्षात नातेवाईक व ग्रामस्थ वारजेकरांच्या माध्यमातून पालिकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यात यशस्वी होण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न केले." असे सांगत सायली वांजळे शिंदे हिने कृतज्ञता व्यक्त केली.  

शुक्राचार्य वांजळे यांनी आहिरेगावाचे प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत पुन्हा बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांना चालना दिली पाहिजे. असे सांगितले.

"सीरम'ला लसीची पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार

पदाधिकाऱ्यांना मास्क घालायला लावले
व्यासपीठावरील काही अनेक पदाधिकारी बिगर मास्कचे बसलेत असे सांगत त्यांनी मास्क घालण्यास सांगितले. मुळशीप्रमाणे खडकवासला परिसरातील नागरिक कोरोना गेला असेच वागत आहेत. बिगर मास्कचे फिरताना दिसत आहेत. नियम पाळा असे आवाहन ही त्यांनी केले. 

यावेळी सायली वांजळे यांच्यासह नगरसेवक दिलीप बराटे, विरोधी पक्षनेत्या व नगरसेविका दीपाली धुमाळ, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, हर्षदा वांजळे, शुक्राचार्य वांजळे, दीक्षा वांजळे, बाबा धुमाळ, अनिता इंगळे, पूजा पारगे, स्वाती पोकळे, सुरेखा दमीष्टे, हिंदकेसरी अमोल बराटे, सरपंच युवराज वांजळे, सरपंच नितीन धावडे, सरपंच सौरभ मते व युवा नेते कु.मयुरेशराव रमेशभाऊ वांजळे उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule said that New mayor of Pune will belongs to NCP in 2022