पुणे : ‘‘महाराष्ट्राच्या ७० वर्षांच्या इतिहासात जेवढी राज्याची बदनामी झाली नाही, तेवढी महायुती सरकारच्या दीडशे दिवसांमध्ये झाली आहे. गाव, वाडी, वस्तीपासून दिल्लीपर्यंत बदनामी सुरू आहे. दर ५० दिवसांनी एखादी ‘विकेट’ जातेय, सरकारने नेमके काय चालवले आहे?’’ अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी राज्य सरकारला धारेवर धरले.