काँग्रेसच्या नगराध्यक्षांच्या घरी खासदार सुप्रिया सुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

supriya sule and mayor nirmala aware

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (ता.१३) दुपारी भोरच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा निर्मला आवारे यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली.

काँग्रेसच्या नगराध्यक्षांच्या घरी खासदार सुप्रिया सुळे

भोर (पुणे) - बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (ता.१३) दुपारी भोरच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा निर्मला आवारे यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असून भोर नगरपालिकेच्या राजकारणात वेगळे बदल होणार हे निश्चित झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी भोर तालुक्याच्या दौ-यावर आल्या.

शहरातील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक १ च्या दुरावस्थेची पाहणी केल्यायानंतर त्या नगराध्यक्षा निर्मला आवारे यांच्या घरी गेल्या. नगराध्यक्षा निर्मला आवारे व माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ आणि पुस्तक देवून स्वागत केले. त्यांच्याशी दहा-पंधरा मिनिटे चर्चा केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मी माझ्या मतदारसंघातील नगराध्यक्षा निर्मला आवारे यांची प्रेमाची भेट घेण्यासाठी आले असल्याचे सांगितले. तर खासदार भोरमध्ये आल्या म्हणून त्यांना मी चहा घेण्यासाठी निमंत्रीत केले असल्याचे सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, नगरसेवक यशवंत डाळ, शहराध्यक्ष नितीन धारणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, युवानेते विक्रम खुटवड, सारंग शेटे, शहराध्यक्षा हसीना शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

नगरपालिकेतील नगरसेवक आणि नगराध्यक्षा यांच्यामधील नाराजीची नुसती चर्चा होती. परंतु काँग्रेसच्या नगराध्यक्षांच्या घरी राष्ट्रवादीच्या खासदार अचानक येतात आणि सदिच्छा भेट घेतात. यामुळे भोरवासीयांच्या भुवया उंचावल्या असून नगरपालिकेच्या राजकारणात कोणकोणत्या घटना घडतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात बहुतेक नगराध्यक्षांच्या विरोधात वाद झालेले आहेत. केवळ वादच नाही तर वाद न्यायालयामध्ये जाऊन नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना पदावरून घरी जावे लागले आहे. अशा प्रकारच्या वादाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होईल की काय? आणि विकासकामांची घोडदौड थंडावेल. अशी भिती भोरवासीयांना लागलेली आहे.

Web Title: Supriya Sule Visit To Bhor Congress Mayor Nirmala Aware Home Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..