Supriya Sule : सुप्रिया सुळे यांची रात्री शिक्षक आंदोलनाला भेट; विक्रम कुमार यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न

सुप्रिया सुळे; शिक्षकांच्या या आंदोलनात मी शेवटपर्यंत सोबत राहील. त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल
Supriya Sule
Supriya Sulesakal
Updated on

पुणे : पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची रात्री नऊ वाजता खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. आंदोलन स्थळावरून त्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही.

शिक्षकांच्या या आंदोलनात मी शेवटपर्यंत सोबत राहील. त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. ही एक सामाजिक लढाई आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाच्या अंमलबजावणी करीता प्रसंगी कायदेशीर मदत करू असे आश्वासन खासदार सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना दिले.

Supriya Sule
Ashadi Wari 2023 : ‘तुकाराम तुकाराम’ असा बोल,...भक्तीत तल्लीन झालेला सोहळा रोटी घाट पार करून उंडवडीच्या माळरानावर मुक्कामी

आंदोलन करणाऱ्यामध्ये बहुतांशी महिला शिक्षिका आहेत. सुळे यांसोबत संवाद साधताना अनेक महिला शिक्षकांना अश्रू अनावर झाले. रामाचाही वनवास 14 वर्षानंतर संपला होता. मग आमच्यावरच अन्याय का, मला न्याय मिळवून द्या. अन्यथा उपोषणाची लढाई आणखी तीव्र करू, अशा भावना यावेळी आंदोलनकर्त्या शिक्षकांनी खासदार सुळे यांच्यासमोर व्यक्त केल्या.

Supriya Sule
Dr. Anil Ramod : रामोड कुटुंबीयांच्या खात्यात ४७ लाखापेक्षा जास्त रक्कम; सीबीआयची माहिती

या ठिकाणी उपोषण करणाऱ्या प्रकाश शिंदे या शिक्षकाचीही त्यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. आमरण उपोषणासारखे पाऊल उचलण्याऐवजी साखळी उपोषण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. दरम्यान शनिवारी सायंकाळी पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही उपोषण स्थळी शिक्षकांची भेट घेऊन महापालिका आयुक्त विक्रम कुमार तसेच अतिरिक्त आयुक्त श्री बिनवडे यांसोबत फोनवरून संपर्क साधला होता.

Supriya Sule
Pune Crime : गडचिरोलीतून गांजा विक्रीसाठी आलेल्या तीन तरुणांना अटक

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवेत कायम करा, या शिक्षकांच्या मागण्यांवर सोमवार तारीख 19 रोजी पुणे महापालिकेत बैठक घेऊन तोडगा काढणार आणि शिक्षकांना न्याय मिळवून देणार असल्याचे जगदीश मुळीक यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील 93 शिक्षक महापालिका सेवेत कायम करा या मागणी करता महापालिकेसमोर गेले तीन दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. सदर 93 शिक्षकांना सेवेत कायम करून वेतनाचा फरक अदा करा असा निकाल शिक्षकांच्या बाजूने उच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2023 मध्ये दिलेला आहे. मात्र चार महिन्यानंतरही उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी पुणे महानगरपालिका प्रशासनाने न केल्यामुळे शिक्षक आंदोलनाला बसलेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.