दिल्लीतील आशियाई कुस्तीस्पर्धेमध्ये इंदापूर तालुक्यातील सुरज कोकाटेचे यश

राजकुमार थोरात
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सुरज कोकाटे याने 61 किलो वजन गटामध्ये देशाला कांस्यपदक मिळवून दिले. कुस्ती स्पर्धेेतील यशाबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी सन्मानचिन्ह देवून सत्कार केला.

वालचंदनगर - दिल्ली येथे झालेल्या फ्री स्टाईल ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पधेमध्ये इंदापूर तालुक्यातील सुरज कोकाटे याने कांस्य पदक पटकावून इंदापूरचे नाव देशामध्ये चमकावले. 

दिल्लीमध्ये ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पर्धा सुरु आहे.यामध्ये इंदापूर तालुक्यातील सराटी गावातील सुरज कोकाटे याने 61 किलो वजन गटामध्ये देशाला कांस्यपदक मिळवून दिले. कुस्ती स्पर्धेेतील यशाबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. यावेळी माने यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मुला-मुलींकडे अनेक सुप्त गुण आहेत. पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यामध्ये सुप्त गुण ओळखून त्यांना वाव देण्याचा प्रयत्न करावा. युवकांनाही मैदानी खेळाचा सराव करुन स्पर्धेमध्ये यश मिळवून देशाचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी इंदापूर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अशोक चोरमले, रमेश पाटील, प्रविण गलांडे, गणेश काळदाते, साधू नरुटे, नाना पाडुळे, स्वप्निल काळे  उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suraj Kokates success in Indapur taluka in Asian Asian wrestling competition in Delhi