

suresh kalamadi
esakal
पुणे: माजी खासदार आणि राजकीय पटलावर दीर्घकाळ वर्चस्व गाजवणारे सुरेश कलमाडी यांचे आज निधन झाले. कलमाडींची कारकीर्द अनेक घटनांनी भरलेली होती, आणि त्यांच्या निधनाने त्यातील काही जुने किस्से पुन्हा चर्चेत आले आहेत. विशेषतः २००३ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेला एक मोठा उलटफेर, ज्यात कलमाडी केंद्रस्थानी होते. या घटनेत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पदावरून हटवण्यात कलमाडींची महत्त्वाची भूमिका होती, आणि हा सगळा प्रकार काँग्रेस पक्षांतर्गत गटबाजीचा परिणाम होता.