

suresh kalmadi
esakal
पुणे : माजी खासदार आणि वायुसेनेचे निवृत्त अधिकारी सुरेश कलमाडी यांचे आज वयाच्या ८२ व्या वर्षी पुण्यात निधन झाले. त्यांच्या राजकीय जीवनात अनेक वादळी प्रसंग घडले, पण त्यांच्या वायुसेनेतील धाडसी कृत्यांनी इतिहास घडवला. यासाठी त्यांना ८ पुरस्कार देखील मिळाले आहेत. विशेषतः मिझोराममधील दहशतवाद दडपण्यासाठी केलेल्या हवाई हल्ल्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरली, ज्याने त्या प्रदेशाचा विकासाचा मार्ग मोकळा झाला.