Suresh Kalmadi | Suresh Kalmadi: 'मी पुन्हा येईन'; म्हणत १० वर्षांनी 'पुण्याचे कारभारी' महापालिकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suresh Kalmadi in Pune Municipal Corporation
Suresh Kalmadi: 'मी पुन्हा येईन'; म्हणत १० वर्षांनी 'पुण्याचे कारभारी' महापालिकेत

Suresh Kalmadi: 'मी पुन्हा येईन'; म्हणत १० वर्षांनी 'पुण्याचे कारभारी' महापालिकेत

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी १० वर्षांनी पुणे महानगर पालिकेत दाखल झाले आहेत. आता नेहमी येत जाईन, अशी प्रतिक्रियाही कलमाडी यांनी यावेळी दिली आहे. यावेळी कलमाडी काठीच्या साहाय्याने चालताना दिसले.

काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांनी आज पुणे महानगरपालिकेला भेट दिली. पुणे फेस्टिव्हलचं आमंत्रण महानगर पालिका आयुक्तांना देण्यासाठी आपण इथं आलो असल्याचं कलमाडी यांनी सांगितलं. यावेळी कलमाडी काठीचा आधार घेऊन चालत असल्याचं दिसून आलं. त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारीसुद्धा होते.

सुरेश कलमाडी तब्बल १० वर्षांनी पुणे महानगर पालिकेत आले आहेत. कॉमनवेल्थ घोटाळा उघडकीस आल्यानंतर सुरेश कलमाडी यांना काँग्रेस पक्षातून निलंबित व्हावं लागलं होतं. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना फारशी हजेरी लावली नव्हती. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपाच्या नेत्यांसोबत गणपती विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या.

Web Title: Suresh Kalmandi Congress Leader In Pune Municipal Corporation After 10 Years

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Maharashtra Politics