पुणे : पोलिस आयुक्तालयात आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime case

पुणे : पोलिस आयुक्तालयात आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू

पुणे : चारित्र्य पडताळणीच्या प्रमाणपत्रासाठी आलेल्या सुरेश पिंगळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी(ता.18) दुपारी पोलिस आयुक्तालयात घडली. त्यांनी हाताची नस कापून घेत ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून घेतले. यात तो ९० टक्क्यांहून अधिक भाजला असून त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा आज संध्याकाळी साडे सहा वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पिंगळे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. (Pune News)

हेही वाचा: पुणे : शिक्षकांविनाच चालताहेत रात्रशाळा!

सुरेश विठ्ठल पिंगळे (वय ४२, रा. खडकी) हे कुटुंबीयांसह खडकीतील आंबेडकर चौकात राहायला आहे. त्यांना खासगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून नोकरी मिळाली होती. त्यासाठी त्यांनी एक जुलैला चारित्र्य पडताळणीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मात्र, पत्ता चुकीचा असल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द करून नव्याने सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. दरम्यान, २२ जुलैला नाम साध्यर्मामुळे समर्थ, कोथरूड, सहकारनगर पोलिस ठाण्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल असल्याचे संगणक प्रणातील दिसून आले. त्यानंतर पुन्हा त्यांचा अर्ज ‘व्हेरिफिकेन’साठी पाठविण्यात आला. २७ जुलैला तक्रारींचे निवारण करून अर्ज स्वीकारण्यात आला होता.

हेही वाचा: बिल्डर धार्जिणा विकास आराखडा; नागरिकांचा आराखड्याला विरोध

चारित्र्य पडताळणीचा दाखला मिळविण्यासाठी पिंगळे बुधवारी पोलिस आयुक्तलयाच्या परिसरातील तक्रार निवारण खिडकीजवळ आले होते. त्याठिकाणी त्यांच्या शंकेचे निराकरण झाले नाही. त्यामुळे विमनस्क अवस्थेत त्यांनी हाताची नस कापून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले. पेटलेल्या अवस्थेतच त्यांनी पोलिस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून गुन्हे शाखेच्या कार्यालयानजीक असलेल्या मंदिरापर्यंत धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी चादर आणि पोत्याच्या साह्याने त्याच्या अंगावरील आग अटोक्यात आणली. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले होते.

टॅग्स :Pune Newspolicecrime