शांताबाईंची शस्त्रक्रिया यशस्वी; मुलींनी मानले दानशुरांचे आभार

The surgery of Shantabai was successful due to help of doner
The surgery of Shantabai was successful due to help of doner

पुणे : शांताबाईंना ब्रेन ट्युमर असल्यानं डॉक्टरांनी दोन शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले होते. धुनी-भांडी करुन चार मुलींना संभाळणाऱ्या शांताबाईंच्या मुलींनी लोकांकडून हात उसणे, कर्जाने पैसे घेऊन मागील वर्षी एक शस्त्रक्रिया केली. पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याने मुलगी शुभांगी पैशासाठी धावाधाव करत होती. या संदर्भात दैनिक सकाळच्या माध्यमातून मुलगी शुभांगी यांनी मदतीचे आवाहन केले होते. आवाहनास प्रतिसाद देत दानशूर व्यक्तींनी जवळपास ८३ हजार रुपये मुलींच्या खात्यावरती जमा केले.

पुणे(गोखलेनगर).वडारवाडी येथील सामान्य कुटुंबातील शांताबाईंच्या शस्त्रक्रियेसाठी पैशाची गरज असल्याने मुलगी शुभांगी पैशाची जमवाजमव करण्यासाठी धावाधाव करत होती. गुरवारी (ता.२९) सकाळमध्ये मदतीचे आवाहन म्हणून बातमी प्रसिद्ध करण्यात आली. समाजातील दानशूर नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास ८३ हजार रुपये शुभांगी अलगुडे यांच्या बॅंक खात्यावर जमा केले. परिस्थितीतून खचलेल्या शांताबाईंना ही मदत जीवनदायी ठरली असून.शनिवार (ता.७ नोव्हेंबर) रोजी दुपारी सुर्या सह्याद्री हॉस्पिटल, कसबा पेठ पुणे येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली.  शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉ.रनजीतसिंग देशमुख यांनी अलगुडे परिवाराला सांगितले. दानशुर नागरिकांनी केलेल्या मदतीबद्दल शांताबाई अलगुडे यांनी आभार मानले आहेत. ''शस्त्रक्रिया केल्यामुळे मला नवा जन्म मिळाला'' असं शांताबाई म्हणाल्या. शांताबाईं सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

"मी त्या सगळ्यांची खूप खूप अभारी आहे. ज्यांनी, माझ्या गरजेच्या वेळी मोलाची मदत केली. तुमच्या सर्वांच्या मदतीमुळे माझ्या आईची शस्त्रक्रिया पार पडली. तुम्ही तुमच्य वेळेत - वेळ काढून मदत केली. माझ्या आईला तुमच्यामुळे नवं - जीवन मिळालं. सर्व दानशूर व्यक्तींचे शतशः ऋणी आहे".
- शुभांगी अलगुडे, शांताबाई अलगुडे यांची मुलगी.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"दानशूर व्यक्तींनी मदत केल्यामुळे शांताबाईंची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.मानसातील मानुसकी जिवंत असल्याचं उदाहरण ठरलं आहे.मदतीच्या आवाहनाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे".
- महेंद्र पवार अध्यक्ष मुकेश प्रतिष्ठान
 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com