‘सूरस्पर्श’ उपक्रमांतर्गत एकवटले कलाकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

समाजाची चित्तशुद्धी करण्यात कला आणि कलाकारांचे योगदान महत्त्वाचे असते. कलाकार अडचणीत असताना त्याला मदत करण्यासाठी पुढे येणे, हे समाजाचेही कर्तव्य आहे. ‘सूरस्पर्श’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते होत असल्याचा आनंद आहे. 
- पं. सुरेश तळवलकर

सांगली, कोल्हापुरातील कलाकारांच्या मदतीसाठी पुण्यात झाला कार्यक्रम
पुणे - कलाकाराचे दु:ख ओळखण्यासाठी कलाकाराचेच मन असावे लागते, असे म्हणतात. याचीच अनुभूती रविवारी पुण्यात झालेल्या ‘सूरस्पर्श’ या कार्यक्रमात आली. आवर्तन गुरुकुल, पारिजात अॅकॅडमी व हेरिटेज इव्हेंट्‌स यांच्या वतीने सांगली, कोल्हापूर भागावर ओढविलेल्या पूर परिस्थितीमध्ये या भागातील ज्या कलाकारांच्या वाद्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना गरजेप्रमाणे वाद्यांची दुरुस्ती करून अथवा नवी वाद्ये देत मदतीचा हात देण्यात आला.

एरंडवणे येथील शकुंतला शेट्टी सभागृहात तालयोगी पं. सुरेश तळवलकर, उस्ताद तौफिक कुरेशी, पं. मिलिंद तुळाणकर, पं. रामदास पळसुले, कथक गुरू शमा भाटे, हेरिटेजचे संतोष पोतदार, पारिजात अकॅडमीचे भुवनेश व विजय कुलकर्णी, संस्कार भारतीचे प्रांताध्यक्ष सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. नादरूपाच्या नृत्यांगना अमीरा पाटणकर, अवनी गद्रे, शिवानी करमरकर, निकिता कारळे आणि भार्गवी सरदेसाई यांनी रामवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sursparsh Event for flood affected help by actor