
पुणे : मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर दिलेल्या आदेशानुसार संरक्षण विभागाच्या आस्थापनांलगत असणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रातील बांधकामांचे महापालिकेकडून शनिवारपासून (ता. ५) सर्वेक्षण केले जाणार आहे. रेड झोन निश्चितीसाठी व प्रतिबंधित क्षेत्रातील बांधकामे, त्यांची व्याप्ती याबाबतची माहिती उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यासाठी संबंधित सर्वेक्षण होणार आहे. कळस, धानोरी, वडगाव शेरी, खराडी व लोहगाव या गावांमध्ये सर्वेक्षण होणार आहे.