
Pune Latest News: पुणे शहरामध्ये सर्वधर्मीय धार्मिक स्थळांवर १८३० भोंगे असल्याची नोंद पोलिस प्रशासनाकडे आहे. या भोंग्यांचं सर्वेक्षण होणार असून अनधिकृत भोंग्यांची माहिती घेण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी ठाण्यांना दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आदेशाचं पालन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.