Pune News : विश्वाचा ‘चित्रपट’ बनविणाऱ्या सर्वेक्षणाला प्रारंभ; ‘व्हेरा रुबीन’ वेधशाळेच्या ‘लीगसी सर्व्हे ऑफ स्पेस अँड टाइम’ला सुरुवात

चिलीमधील अत्याधुनिक व्हेरा सी. रुबीन ऑबझर्व्हेटरीच्या ‘लीगसी सर्व्हे ऑफ स्पेस अँड टाइम’ (एलएसएसटी) या बहुप्रतीक्षित सर्वेक्षणाची नुकतीच अधिकृत सुरुवात झाली.
Vera Rubin Observatory

Vera Rubin Observatory

sakal

Updated on

- मयूरेश प्रभुणे

पुणे - चिलीमधील अत्याधुनिक व्हेरा सी. रुबीन ऑबझर्व्हेटरीच्या ‘लीगसी सर्व्हे ऑफ स्पेस अँड टाइम’ (एलएसएसटी) या बहुप्रतीक्षित सर्वेक्षणाची नुकतीच अधिकृत सुरुवात झाली. या वेधशाळेच्या माध्यमातून दर आठवड्याला सलग दहा वर्षे दक्षिण गोलार्धातून दिसणाऱ्या संपूर्ण आकाशाचे चित्रण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे कृष्ण पदार्थ, कृष्ण ऊर्जा यांचे कोडे उलगडण्याची शास्त्रज्ञांना अपेक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com