सातारा महामार्गाचे रुंदीकरण रखडल्याचे कारण समजणार...

महेंद्र शिंदे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

पुणे- सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाच्या सद्यःस्थितीचे भोर महसूल विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असल्याचे भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले. 

खेड शिवापूर (पुणे) : पुणे- सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाच्या सद्यःस्थितीचे भोर महसूल विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असल्याचे भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले. 

पुणे- सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. भोर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मंगळवारी या रखडलेल्या रुंदीकरणाच्या कामाचे सर्वेक्षण करण्यात आले. शिंदेवाडी ते चेलाडी, चेलाडी ते कापूरहोळ आणि कापूरहोळ ते सारोळा, असे तीन टप्प्यांत सर्वेक्षणाचे काम करण्यात आले. या सर्वेक्षणात उड्डाण पूल, सेवा रस्ते यांची प्रलंबित कामे, खड्डे, अनधिकृत दुभाजक याच्या ठिकाणानुसार नोंदी करून छायाचित्रणही करण्यात आले आहे. 

याबाबत भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव म्हणाले, ""पुणे- सातारा रस्त्याच्या रखडलेल्या रुंदीकरणासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे आणि जिल्हाधिकाऱ्यांची काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. या बैठकीत या रस्त्याच्या सद्यःस्थितीचा अहवाल मागविण्यात आला होता. त्यानुसार पुणे- सातारा रस्त्याच्या शिंदेवाडी ते सारोळ्यापर्यंतच्या सद्यःस्थितीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Survey of the widening work of Satar Highway