निकाल जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

निकाल जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा
Published on

सूर्या कणसेने पटकावली पाच सुवर्णपदके

‘टाइम अटॅक’ जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा; आदित्य खामकर, नरेंद्र जगतापचे उज्ज्वल यश

सातारा, ता. ६ : जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने एमकेबीए यांच्या वतीने झालेल्या जिल्हास्तरीय टाइम अटॅक बॅडमिंटन स्पर्धेत सूर्या कणसेने पाच सुवर्णपदकांची कमाई केली. या स्पर्धेत आदित्य खामकर व नरेंद्र जगताप यांच्यासह विविध खेळाडूंनी दमदार ठसा उमटविला.
स्पर्धेचे उद्‍घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, स्पर्धा सचिव सुरेश साधले व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सुधाकर शानभाग यांच्या हस्ते, तर पारितोषिक वितरण समारंभ असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन देशमुख, उपाध्यक्ष राजदीप माजगावकर, सचिव सुधाकर शानभाग, पोलिस उपनिरीक्षक शामराव गोराड, परितोष दातीर आदींच्या हस्ते झाला.
स्पर्धेतील विविध गटातील निकाल असा : १३ वर्षाखालील मुली : गौरी गोंडकर वि.वि. विभावरी कांबळे (३३-२६). मुले - अनय वाघमारे वि.वि. विराजसिंह राजपूत (३२-२३).
१५ वर्षाखालील मुली : गौरी गोंदकर वि.वि. विभावरी कांबळे (३२-२४). मुले - श्लोक भोसले वि.वि. आराध्य पवार (२८-२४).
१५ वर्षाखालील मुली : सूर्या कणसे वि.वि. आर्या कर्णे (३१-२६), मुले : आराध्य पवार वि.वि. श्लोक भोसले (३५-१६).
१७ वर्षाखालील मुले (दुहेरी) : वेदराज बारटक्के व अदिश जाधव वि.वि श्लोक चव्हाण व अयान सय्यद (३३-२९).
१७ वर्षाखालील मुली : सूर्या कणसे वि.वि. शर्वरी मोरे- पाटील (३३-२६).
१९ वर्षाखालील मुले ः सक्षम जाधव वि.वि. आदित्य खामकर (२६-२४).
१९ वर्षाखालील मुले ः (दुहेरी) : सक्षम जाधव व आदित्य खामकर वि.वि. वेदराज बारटक्के व अदिश जाधव (३२-३०).
महिला एकेरी : सूर्या कणसे वि.वि. शर्वरी मोरे- पाटील (३६-२१).
पुरुष एकेरी : आदित्य खामकर वि.वि. नरेंद्र जगताप (२५-२३).
महिला दुहेरी : सूर्या कणसे व आर्या कर्णे वि.वि. अनन्या काटे व शर्वरी मोरे- पाटील (३०-२४).
मिश्र दुहेरी : ओंकार सावंत व सूर्या कणसे वि.वि. नरेंद्र जगताप व श्रेया जाधव (३६-२५).
पुरुष दुहेरी : नरेंद्र जगताप व कृष्णा जाधव वि.वि. ओंकार सावंत व शांतनू दिवेकर (३०-२८).
मास्टर्स दुहेरी ३५ वर्षावरील : शामराव गोराड व परितोष दातीर वि.वि. चेतन नलवडे व नवनाथ वाळेकर (३५-२२).
मास्टर्स दुहेरी ४५ वर्षावरील : विशाल दाभाडे व अस्लम बागवान वि.वि. प्रशांत भोसले व किरण देशमुख (२९-२४).

PNE26W40366
सातारा ः एमकेबीए यांच्या वतीने झालेल्या जिल्हास्तरीय टाइम अटॅक बॅडमिंटन स्पर्धेतील यशस्वितांसमवेत सचिन देशमुख, राजदीप माजगावकर, सुधाकर शानभाग आदी.
---------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com