माजी सभापती सुशीला सुरेश चौगुले यांची विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड.

माजी सभापती सुशीला सुरेश चौगुले यांची विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड.

Published on

ANJK26A00002
सुशीला चौगुले

विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या संचालकपदी चौगुले
अंजनगाव (खे.), ता. ४ ः विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी माजी पंचायत समिती सभापती सुशीला सुरेश चौगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकार क्षेत्रात प्रतिनिधित्व करण्याची अंजनगाव खे. परिसरात पहिली महिला म्हणून संधी मिळाली.
सुशीलाताई चौगुले यांच्या निवडीने संचालक मंडळात महिलांचे सक्षम प्रतिनिधित्व वाढले असून, महिला सभासदांच्या प्रश्नांना आता अधिक बळ मिळणार आहे. निवडीची घोषणा होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करत आणि आतषबाजी करत जल्लोष केला. कारखान्याचे संचालक रणजितसिंह शिंदे आणि इतर नवनियुक्त संचालकांनी सुशीलाताईंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ही निवड माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे. कारखान्याच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या कल्याणासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. तसेच महिलांना सहकार क्षेत्रात पुढे आणण्यासाठी माझे विशेष प्रयत्न राहतील असे सुशीलाताई सुरेश चौगुले यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com