

Pune Municipal Corporation
Sakal
पुणे - पुणे महापालिकेतील ‘पॉवरफुल’ पद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहर अभियंता पदावर पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना पदोन्नती देण्याचा निर्णय आज महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विभागीय पदोन्नती समितीने घेतला आहे. त्यास शहर सुधारणा समितीच्या बैठकीतही मान्यता देण्यात आली. विद्यमान शहर अभियंता प्रशांत वाघमारे हे सेवानिवृत्त होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.