

चाकण, ता. १३ : रासे (ता. खेड) येथील आदिवासी समाजासाठी उभारण्यात आलेल्या ५२ घरकुलांची पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नुकतीच पाहणी केली. या प्रकल्पातील सांडपाणी प्रक्रिया, सौर ऊर्जा आणि जलसंधारणाच्या कामांचे त्यांनी कौतुक केले, तसेच प्रलंबित सुविधा तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या दौऱ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी घरकुल प्रकल्पातील वीज, पाणी, ड्रेनेज आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेचा आढावा घेतला. विशेषतः ग्रे-वॉटर ट्रीटमेंटद्वारे होणारा पाण्याचा पुनर्वापर आणि सोलर सिस्टिमची त्यांनी माहिती घेतली. यावेळी त्यांनी ठाकरवाडीतील पाणीपुरवठ्यासाठी सोलर पंप बसवण्याचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी आणि रहिवाशांसाठी जातीचे दाखले काढण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले. याप्रसंगी खेड पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, जिल्हा परिषद सदस्य गणेश आरगडे, उपसभापती मंगेश सावंत, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी भोईर, खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे, हॅबिटेट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.