

फोटोओळ : MLG26B03486
माळीनगर (ता. माळशिरस) : दि. सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार.
स्वाभिमानी पॅनलचा दणदणीत विजय
११ पैकी १० जागांवर विजय; जयशंकर पॅनलला एका जागेवर समाधान
सकाळ वृत्तसेवा
माळीनगर, ता. ५ : दि. सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या २०२६-२७ ते २०२८-२९ या कालावधीसाठी झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी पॅनलने ११ पैकी १० जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला. जयशंकर पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
११ जागांसाठी स्वाभिमानी व जयशंकर पॅनलमध्ये ९ पुरुष व दोन महिला जागांसाठी निवडणूक झाली. दि. मॉडेल विविधांगी प्रशालेत रविवारी (ता. ४) मतदान झाले. एक हजार २३ मतदारांनी मतदान केले. पुरुषांची ५१, तर महिलांची १५ मते बाद ठरली. सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेदहा या वेळेत मतमोजणी झाली. ॲड. रमेश जाधव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. चेअरमन मोहन लांडे यांनी नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार केला.
------------------
विजयी उमेदवार : रत्नदीप बोरावके (५८३), डॉ. अविनाश जाधव (५७५), कल्पेश पांढरे (५६७), अजय गिरमे (४९७), केतन बोरावके (५७०), प्रीतम राऊत (५१९), विक्रांत कुदळे (५५७), रोहित गिरमे (५१४), मंजूषा झगडे (५७६), स्नेहा गिरमे (५६८) — स्वाभिमानी पॅनल. आकाश राऊत (४७०) — जयशंकर पॅनल.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.