
पुणे : शहरात रोज अतिक्रमण कारवाई केली जाते, अनधिकृत फ्लेक्स काढले जातात, झाडलोट केली जाते, असा दावा महापालिकेकडून केला जातो. मात्र सध्या सुरू असलेल्या ‘डीप क्लीन’ मोहिमेत या कामांची पोलखोल झाली आहे. पहिल्या दिवशी २७ टन ओला-सुका कचरा, ५९ टन राडारोडा, १२ टन झाडांचा पालापाचोळा गोळा झाला आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून रोजचे काम केले जाते की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.