स्वामी विवेकानंद स्कूलचा १०० टक्के निकाल

स्वामी विवेकानंद स्कूलचा १०० टक्के निकाल
Published on

तळेगाव दाभाडे, ता. ८ ः श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचा दहावीच्या १०० टक्के निकालाची परंपरा सलग तेराव्या वर्षीही कायम राहिली आहे. विद्यालयात ऋतुजा सोनटक्के (९१.८० टक्के), शांभवी कुलकर्णी (९१ टक्के), समृद्धी जाधव (९०.८० टक्के) यांनी गुण मिळवून यश मिळविले. संस्थेचे सचिव मिलिंद शेलार, मुख्याध्यापिका रेणू शर्मा, सिद्धेश्वर सोनवणे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, रजनीगंधा खांडगे, दादासाहेब उऱ्हे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com