MPSCच्या मायाजालात पडू नका; स्वप्निलने पत्रातून मांडली वेदना

Swapnil Lonkar
Swapnil LonkarSakal

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. फुरसुंगी जवळील गंगानगर येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली. स्वप्नील सुनील लोणकर (वय २४, रा. फुरसुंगी), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. स्वप्नीने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी संपादन केली होती. त्याचे आई-वडील शनिवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्नीलने त्याच्या खोलीत गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात हलविले, तेथे डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषित केले.

स्वप्नील एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. त्याचबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली. त्यामध्ये पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला. मात्र, कोरोनामुळे मुख्य परीक्षा झाली नाही. या तणावातून आत्महत्या केल्याचे त्याने मृत्युपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

Swapnil Lonkar
अनैतिक संबंधातून महाराजाने केला खून, चौघांना अटक

मन हेलावून टाकणारं पत्र -

कोरोना नसता तर सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या. हवे ते ठरवून साध्यही करता आले असते. आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगल असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! मी खचलो मुळीच नाही, फक्‍त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता! एमपीएससीच्या मायाजालात पडू नका, ‘जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचवा, अनेक जीव वाचतील,’ अशा शब्दात स्वप्नीलने स्पर्धा परीक्षांबाबत राज्य सरकारच्या चालढकल धोरणावर सुसाईट नोटमध्ये बोट ठेवले आहे.

Swapnil Lonkar
धक्कादायक! MPSC उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्यानं विद्यार्थ्याची आत्महत्या

तरुणांनी मोकळेपणाने बोलण्याची गरज

"" तरुणांनी कुठल्याही प्रकारचा ताण आल्यास कुटुंब, मित्रांशी संवाद वाढवावा. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलल्यास त्यांचा ताण कमी होईल. तसेच थेट जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेऊ नये. नकार स्वीकारण्याची तयारी ठेवून प्रश्‍न सोडविण्यासाठी दुसरा प्लॅनही तयार ठेवला पाहिजे. व्यावसायिक समुपदेशकांशी संवाद साधल्यास ताण-तणावाचे नियंत्रण करता येईल.'' शिल्पा तांबे, समुपदेशक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com