
बारामती (पुणे) : सहा वर्षांची चिमुरडी काय करु शकते? तर ती हट्ट करुन काहीतरी वस्तू मागू शकते किंवा खेळण्यासाठी मागे लागू शकते...पण फलटण तालुक्यातील गोखळी येथील स्वरा योगेश भागवत या इयत्ता पहिलीतील सहा वर्षीय चिमुरडीने रविवारी (ता.7) एका मिनिटात तब्बल शंभर पुशअप्स मारुन सर्वांना आश्चर्यचकीत केले.
बारामती सायकल क्लबची रविवारची फेरी बारामती ते गोखळी अशी होते. मूळची गोखळीची असलेली स्वरा ही उत्तम सायकलपटू आहे. तिने या पूर्वी गोखळी-बारामती-जेजुरी-फलटण-गोखळी हा 143 कि.मी.चा टप्पा तसेच बारामती-नीरा-बारामती हा 81 कि.मी.चा टप्पा सायकलवरुन लीलया पूर्ण केलेला आहे. तिचा स्टॅमिना अफलातून असून तिच्या वयाच्या मानाने ती खूपच जास्त क्षमतेने सायकल चालविते आणि व्यायामही करते.
रविवारी तिने एका मिनिटात तब्बल शंभर पुशअप्स मारून सर्वच सायकल क्लबच्या सदस्यांना चकीत केले. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. तिचे वडील योगेश भागवत हे फलटण आगारात वाहक असून आई गृहिणी आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनीही स्वराच्या या कामगिरीची दखल घेत तिला सन्मानित केले होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.