
पुणे - स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडे याचा जामीन अर्ज सोमवारी न्यायालयाने फेटाळला. गुरुवारी (ता. २६) गाडे याच्या जामीन अर्जावर आरोपी पक्षासह बचाव पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला होता. त्यावर, यांच्या सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.