शिवाजीनगर - स्वारगेट बसस्थाकातून रात्रभर हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रवासी महिलांना विश्रांतीसाठी वेगळी सोय नसल्याने महिलांना देखील उघड्यावरच झोपावे लागते. त्यामुळे येथील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रभर तृतीयपंथी, मद्यापी, पाकीटमारांचा वावर वाढत असल्याने हजारो प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
सुरक्षारक्षकांची कमतरता दिसून येते. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा ताळमेळ दिसून येत नाही. बुधवार (ता.२६) मध्यरात्री दोनच्या दरम्यान चौकशी कक्षात कोणीही कर्मचारी नव्हते, यावेळी प्रवाशांनी चौकशी कोणाकडे करायची असा प्रश्न काही वेळ प्रवाशांना पडला होता.
बुधवार रात्री बारा ते पहाटे साडेपाच दरम्यान स्वारगेट एसटी बसस्थानकातील सुरक्षेचा आढावा 'सकाळ'च्या प्रतीनिधीने घेतला, यावेळी प्रवाशांच्या असुविधा व सुरक्षेविषयीच्या अनेक बाबी समोर आल्या.
रिक्षाचालकांकडून प्रावाशांची लूट
स्वारगेटमधून जेजुरीला जाण्यासाठी प्रत्येकी पाचशे रूपये रिक्षा भाडे देण्याची मागणी रिक्षाचालकाने केली. रात्री प्रवाशांची गरज लक्षात घेता रिक्षाचालक मनमानी भाडे मागतात. काही रिक्षाचालक बसस्थानकाच्या आतमध्ये रिक्षा घेऊन येतात.
संपूर्ण बसस्थानकात पोलिस कर्मचारी नसल्याने पाकीटमार, तृतीयपंती दहशत माजवतात. बसस्थानकाच्या कॅनॅालकडील भिंतीवरून उडी मारून पाकीटमार पसार होतात. अनेक बसचे दरवाजे लॅाक नसल्याने चोर,पाकीटमार, गुन्हेगार लपण्यासाठी बसचा वापर करतात.
बुलेट्स
- मध्यरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्षाची अवश्यकता
- चोवीस तास दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात यावा.
- परिसरात दिवाबत्ती व सीसीटीव्ही कॅमेरे वाढवण्याची गरज
- सुरक्षा भिंतीची उंची वाढवून त्यावर सुरक्षेविषयी उपायोजना कराव्यात
- मुक्कामी असलेल्या बसची सातत्याने तपासणी करायला हवी.
महिला सुरक्षा रक्षक नेमावेत. विनाकराण आगारात फिराणाऱ्या नागरिकांचा वावर कमी झाला पाहिजे.
येथील सुरक्षा रक्षकांना कोणी जुमानत नसल्याने या ठिकाणी कायम स्वरूपी पोलिस नेमावेत.स्वारगेट परिसरात असलेले झोपडपट्टीतील गुन्हेगार मोठ्या प्रमाणात येथे येतात.
-राहुल चव्हाण, अध्यक्ष स्वारगेट रिक्ष संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.