
स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या बलात्कार प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. या घटनेविरोधात पुण्यात तीव्र निषेध नोंदवले जात असून, सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र, राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांना क्लीनचिट देत खासगी सुरक्षा यंत्रणेवर जबाबदारी टाकली आहे.