Swargate Rape Case : 'त्या' तरुणीचा आज न्यायालयात इन कॅमेरा जबाब नोंदवला

स्वारगेट बस स्थानकातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील तरुणीचा आज न्यायालयात जबाब नोंदविण्यात आला.
swargate crime news dattatray gade
swargate crime news dattatray gadeEsakal
Updated on

पुणे - स्वारगेट बस स्थानकातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील तरुणीचा आज न्यायालयात जबाब नोंदविण्यात आला. इन कॅमेरा झालेला हा जबाब लिफाफा बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्यात आला आहे. तिच्या बाबतीत नेमका काय प्रकार झाला हे जबाबात सविस्तरपणे मांडण्यात आले आहे.

या प्रकरणात आरोपी दत्तात्रेय गाडे याचा नुकताच पोलिसांनी जबाब नोंदविला, तसेच त्याची ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे. स्थानकाच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना २५ फेब्रुवारीला घडली. आरोपी गाडेने तरुणीकडे वाहक असल्याची बतावणी करत तिला शिवशाही बसमध्ये नेले.

त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. तरुणीवर अत्याचार करून पसार झालेल्या गाडे याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलिस कोठडीत असलेल्या गाडेचा जबाब शनिवारी पोलिसांकडून नोंदविण्यात आला होता.

मनाई आदेशासाठी अर्ज -

गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी तरुणीची बदनामी करणाऱ्या पोस्ट समाज माध्यमांवर करण्यात आल्या आहेत. त्यातून तिचे चारित्रहणन होत असून तिची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या पोस्ट करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक आदेश व्हावा, असा अर्ज ॲड. असीम सरोदे यांनी न्यायालयात केला आहे. त्यावर मंगळवारी (ता. ३) सुनावणी होणार आहे. ॲड. सरोदे यांनी या प्रकरणात मुळ फिर्यादी यांची बाजू मांडण्याची संधी मिळावी, यासाठीचा अर्ज देखील केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com